Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात झालेल्या लोकसभा लढतीमध्ये पराभूत झालेले सुजय विखे पाटील यांनी नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. तशी आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
नीलेश लंके यांच्या निवडीचा जाहीर केलेला निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून त्यांनी केली आहे. अॅड. आश्विन होन यांच्यामार्फत सदर याचिका विखे यांनी सादर केली आहे.
४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेतलेला आहे.त्याची पडताळणी व्हावी अशी मागणी असून निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून पडताळणीची मागणी देखील केलेली आहे.
या सोबतच प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी असल्याचेही त्यात म्हटले आहे. याशिवाय
नीलेश लंके यांनी जो निवडणूक खर्च दाखवलाय
तो खर्च आणि केलेला प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नसल्याचेही त्यात म्हटले आहे. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च लंके यांनी दाखवलेला नाही असेही त्यात म्हटले आहे.
परिणामी, लंके यांनी दाखविलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन आदी मुद्दे घेऊन सुजय विखे पाटील यांनी ही याचिका खंडपीठात दाखल केलीये.
१९९१ ची पुनरावृत्ती होईल?
१९९१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे व यशवंतराव गडाख यांच्यात लढत झाली होती व त्यात यशवंतराव गडाख विजयी झाले होते.
या निवडणुकीनंतर विखे हे न्यायालयात गेले व गडाख यांच्या निवडीला आव्हान त्यांनी दिले. या याचिकेनंतर गडाखांची निवड रद्द करण्यात आली होती.
या आधीही आम्ही याबाबत आमच्या बातम्यांमधून याबाबत भाकीत वेळोवेळी वर्तवले होते.
व्हिडीओ पहा : https://youtu.be/lntGJ_Ngdgw?si=mgxwHqBSSnB-GcD7
हे वाचा : अहमदनगरमध्ये पुन्हा १९९१ ची पुनरावृत्ती होणार ? फरक इतकाच गडाखांच्या जागी लंके असतील…
https://ahmednagarlive24.com/election/ahmednagar-politics-will-1991-repeat-again-in-ahmednagar-the-only-difference-is-that-gadakhas-will-be-replaced-by-lankans/