पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आश्वासनाचा विसर,कोरोनावरील लसीची किंमत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने बिहारमध्ये मोफत कोरोना लसीचे आश्वासन दिले होते. मात्र आता पंतप्रधान मोदी म्हणतात कोरोना लसीची किंमत केंद्र आणि राज्य सरकार ठरवेल, असे म्हणत आहे.

यावरून पंतप्रधानांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक घेतली आणि त्यात राज्य व केंद्र सरकार कोरोनावरील लसीची किंमत ठरवेल, असे ते म्हणाले. म्हणजे केंद्र सरकारला जनतेकडून पैसे उकळायचे आहेत का?, हे कसे शक्य आहे.

बिहारमध्ये त्यांनी मोफत लस मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता त्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडला आहे. कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही बाब चांगली आहे.

मात्र, आमची मागणी आहे की, प्रत्येक भारतीयाला विनाशुल्क लस मिळायला हवी.असे नवाब मलिक म्हणाले आहेत. कोरोनावरील लस कधी येईल हे आज सांगणे शक्य नाही.

पण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचा क्रम ठरविला जाणार आहे. लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24