Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम ठेवले जात आहेत. असे असताना आता भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
आमदार शिवेंद्रराजेंनीही काही वेळ गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडीच तास कार्यक्रमाची मजा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण उपस्थित होते. गौतमी पाटील मागील काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे
गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी सातारा येथेच पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एका बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौतमीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे ती अजूनच चर्चेत आली होती. खेड्यापाड्यात तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमांना तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित न करण्याचेच आदेश दिले होते.