Ahmednagar News – जिल्हा बॅंक ही राज्यातील एक अग्रणी बँक असुन या बँकेला मोठी परंपरा आहे. सभासद, शेतकरी व कर्मचारी यांचे हीत बघून ही बॅंक आपले निर्णय घेत असते. विशेष म्हणजे या नावाजलेल्या बॅंकेत सर्वच पक्षाचे लोक संचालक म्हणून काम करत आहेत.
परंतु गेले अनेक दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरती प्रक्रिया, मर्यादेपलीकडे जाऊन नाबार्डचे नियम डावलून साखर कारखान्यांना केलेला अवाजवी कर्जपुरवठा, ७०० पदांचे नोकरभरतीत आरक्षणाला लावलेल्या वाटाण्याच्या अक्षदा अशा अनेक बाबींमध्ये ही बॅंक सपशेल अपयशी ठरली आहे.
जिल्ह्याचे पालकत्व ज्यांचेकडे आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाक्रुषण विखे यांनी बघ्याची भुमिका न घेता, जिल्हा बँकेच्या चाललेल्या कारभारासंर्दभात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जिल्ह्याचे जेष्ठ विधीज्ञ ॲड सुरेश लगड यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक शेतकऱ्यांची कामधेनू असलेली अग्रणी बँक. या बँकेने वेळोवेळी शेतकरी, सभासद व कर्मचारीवर्ग यांचे हिताचे निर्णय घेतलेले आहेत. परंतु या बॅंकेच्या सध्या चाललेल्या गैरकारभाराबाबत शासनाचे पालकमंत्री महोदय यांनी या गंभीर विषयावर ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी ॲड. सुरेश लगड यांनी केली आहे