Categories: राजकारण

जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष,जाणून घ्या त्यांच्याविषयी ही माहिती…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयी झाले आहेत.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत जो बायडन यांना २८४ मते मिळाली, तर मावळते राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ मते मिळाली. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या विजयानंतर वॉशिंग्टनमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा केला.

बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. ते व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती होणारे सर्वांत वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष असतील. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कमला हॅरीस यांची निवड होणार आहे.

जो बायडन यांच्याविषयी :-

जो बायडेन यांच्या या राजकीय काराकिर्दीची सुरुवात ४८ वर्षांपूर्वी झाली.१९७२ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकन सीनेटसाठी निवडून गेले होते. तेव्हा सीनेटवर निवडून गेलेल्या सर्वांत कमी वयाच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला गेला. आणि आता ते सर्वांत वयस्कर राष्ट्राध्य़क्ष होतील.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या कारकिर्दीत बायडेन दोन वेळा उपराष्ट्राध्यक्ष होते.ओबामा यांनी ‘अमेरिकेचे आतापर्यंतचे सर्वात प्रभावी उपराष्ट्रपती’ असा त्यांचा उल्लेखही केला होता. जो बायडेन हे बराक ओबामा यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. या निवडणुकीत तर ओबामा यांनी बायडेन यांचा प्रचार केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24