Maharashtra Politics : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घेत राजीनामा द्यावा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics : गोवारींवर लाठीहल्ला झाला नव्हता, तेथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. दुसऱ्या घटनेत मुंबईतील घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता.

या दोन उदाहरणांतून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घेत राजीनामा द्यावा, असा टोला लगावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेच्या निमित्ताने जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खा. शरद पवार यांनी सांगितले की, मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करणाऱ्या शिंदे सरकारने आज हात वर केले.

लाठीमाराचे आदेश सरकारने दिलेच नव्हते, असे सांगत याप्रकरणी पोलिसांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमाराबद्दल मराठा समाजाची माफी मागितली.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून जुन्या प्रकरणांचा हवाला देण्याचे काम सुरू झाले आहे.

गोवारी समाजाच्या मोर्चादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा कुणी राजीनामा दिला नव्हता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर खा. शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला.

मध्य प्रदेशातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचार आरोप केले होते. त्या आरोपांची सरकारने चौकशी करावी, त आरोपांवर आधी उत्तर द्या आणि जनतेला वस्तुस्थिती सांगाव असे आव्हान खा. शरद पवार यांनी केले आहे.

केंद्रातील सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली असे ‘इंडिया’ला मिळत असलेला देशभरातील प्रतिसाद पाहणी परिवर्तनाची लाट निर्माण होणार आहे. चार दिवसांचे अधिवेशन कशासाठी बोलवले आहे हे माहीत नाही, परंतु इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणाला नाही. ही गरज आता राज्यकर्त्यांना का निर्माण झाली? असाही सवाल खा. शरद पवार यांनी उपस्थित केला.