Ahmednaagr Politics : भाजप आणि मित्रपक्षांकडे सत्ता गेली तर लोकशाही व संविधान शिल्लक राहणार नाही. जगामध्ये अनेक ठिकाणी हुकूमशाही नांदताना अनेक हुकुमशहा होऊन गेले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत हुकुमशाही नव्हती.
सत्ताधार्यांचा सामान्य माणसांपेक्षा सत्तेवरच विश्वास असल्याने त्यामुळे त्यांच्यातील मानवता नष्ट झाली आहे, त्यामुळे आता लोकशाही शिल्लक राहणार नसल्याची भिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान त्यांनी यावेळी निलेश लंकेंबद्दल एक वक्तव्य केले. ते निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उद्देशून मी राणी लंके यांचे आभार मानतो की, त्यांनी असा नवरा सांभाळला..! असे एक वक्तव्य केले होते. त्याची चर्चा सध्या सुरु आहे.
अहमदनगर येथील शहरातील गांधी मैदान येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी खासदार शरद पवार बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री आ.अदित्य ठाकरे, आ.रोहीत पवार,
आ.राहुल जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, योगीता राजळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस अॅड.प्रतापराव ढाकणे,
आमदार सुनील शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे, संभाजी कदम, भूषण होळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, रोहिदास कर्डिले, विक्रम राठोड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात माजी आ. लंके यांच्या साधेपणाविषयी भाष्य करताना विविध दाखले दिले. यात ते म्हणाले, निलेश लंके व राणी लंके यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याने मी काही फुलं आणली होती.
परंतु पण निलेश लंके यांनी ती फुलं दुसऱ्याच्याच हवाली केली. निलेश यांचा स्वभाव असाच अशी की, स्वत:साठी काही ठेवायचे नाही, दुसऱ्याला देऊ टाकायचे. त्यामुळे मी आभार मानतो ते म्हणजे राणी लंके यांचे. कारण की त्यांनी असा नवरा सांभाळला, जो अखंडपणे जनतेत राहतो.
यावेळी आमदार रोहीत पवार यांनी भाषणाच्या प्रारंभीच इंग्रजीत बोलू का, मराठीत बोलू? असा प्रश्न करून भाजपचे उमेदवार खा.डॉ. सुजय विखे यांची खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला.