नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे उपस्थित राहिले. यावेळी ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले , “आपण प्रोटोकॉल पाळल्यामुळे अडचणी आल्या. राजकारणात माझा व्यक्तीगत स्वार्थ नाही. पदापेक्षा जनतेच्या कामाला महत्व दिले.
विकास जर राजकारणाचा मुद्दा असता, तर माझा पराभव झाला नसता. आपण पुढच्या पिढीचा विचार करून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचवण्यात कमी पडलो. त्यामुळे भविष्यात केलेली कुठलीही कामे जनतेपर्यंत पोहचविण्यास विसरू नका,” असा सल्ला देखील माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.
श्रीराम साधना आश्रमाचे सुनीलगिरी महाराज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलराव लंघे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. विखे म्हणाले की, आपण कायम नेवाशाच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. राजकीय नेता कसा असावा हे अनेक वर्ष भाषणातून ऐकलंय.
ते सर्व निकष माझ्यात असल्याचे मला वाटायचे. तरीही आपला पराभव झाला. म्हणून यापुढे विकासाचे राजकारण न करता फक्त कार्यक्रमांना भेटी देणार. कारण हा एकच निकष उरला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हश्या पिकला होता.
यावेळी व्यासपीठावर महंत उद्धव महाराज मंडलिक, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रसाद लोखंडे, अरुण मुंडे, ऋषिकेश शेटे, किसनराव गडाख, दीपक पटारे, बाळासाहेब पवार, शांताराम तुवर, भारती बेंद्रे, भाऊसाहेब कोलते, भाऊसाहेब फुलारी,
अभिजित पोटे, अंकुश काळे, राजेंद्र मते, पुरुषोत्तम सर्जे, सुनील वाघमारे, प्रदिप ढोकणे, नवनाथ साळुंके, विनोद ढोकणे, सोमनाथ कचरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.
तालुक्यातील प्रलंबित असलेल्या संत ज्ञानेश्वर मंदिर विकासाला निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांचे आभार व्यक्त केले. प्रारंभी दत्तात्रय पोटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दीपक आगळे, महेश म्हस्के, किरण शिंदे, अश्पाक शेख, दत्तात्रय नांगरे, हरिभाऊ लंघे, सुनिल लंघे, पांडुरंग लंघे, ,
अजय साबळे, प्रविण लंघे, विजय पवार, सरपंच जगन्नाथ खंडागळे उपस्थित होते. विठ्ठल काळे यांनी सूत्रसंचालन केले. तर अनिल निकम यांनी आभार मानले. व कार्यक्रम पार पडला.