Ahmednagar News : अहमदनगर मधील राजकीय वातावरण आगामी लोकसभेच्या हिशोबाने चांगलेच तापायला लागले आहे. याची झलक सर्वच राजकीय दिवाळीफराळातून दिसून आले. आ. लंके व आ. राम शिंदे यांचा दिवाळी फराळातील मिले सूर मेरा तुम्हारा विशेष गाजला.
परंतु आता खा. सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीत यावर भाष्य करत बोचरे चिमटे काढले आहेत.
दिवाळी फराळाचे आयोजन करून कुणीही आमदार-खासदार होत नाही. फराळ दिल्याने कोणी मोठा झाला असता तर हलवाईवाला देखील आमदार झाला असता असा घणाघात त्यांनी केला. तसेच यावेळी पुढे ते असेही म्हणाले की, राम शिंदे,
मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे यांचे फराळ झाले व सोबतच काही मंडळींचे किरकोळ फराळ जाहले अशी खिल्ली विखे पाटलांनी उडवली. हे कमी होते की काय म्हणून त्यांनी यावेळी रात्रीच्या बारा नंतरची यंत्रणा यावरून देखील खिल्ली उडवली. नगरसेवकांना उद्देशून विखे पाटील म्हणाले, रात्री नऊ नंतर झोपा, कारण रात्री बारानंतर काम करणारी काही लोक आहेत, त्यांना त्यांच काम करु द्या ! रात्री बारानंतरची त्यांच्यासारख्यांची ‘ती’ मेहनत मी करु शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
आता हा रोख कुणाकडे होता हे वेगळे सांगायला नको. दरम्यान आता त्यांच्या या वक्तव्यांनंतर आ. निलेश लंके यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
* आ.लंके-आ. शिंदे यांचा मिले सूर मेरा तुम्हारा चा नारा अन खा. विखे पाटलांचा घणाघात
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांनी मागिल काही दिवसांपासून एकमेकांशी चांगलेच जुळवून घेतले आहे. दोघेही विखे विरोधक आहेत. दोघेही एकमेकांच्या दिवाळी फाळाला आले होते.
येथे त्यांनी एकमेकांच्या कामांचे कौतुक करत लोकसभेला विखे यांना टक्कर देणार असेच जणू काही भाकीत केल्याची चर्चा होती. दरम्यान यावर आता खा. विखे पाटलांनी घणाघात केला आहे. फराळाचे कार्यक्रम ठेऊन कुणी आमदार खासदार होत नसत,
मागील पन्नास वर्षे विखे कुटुंबीयांनी योगदान दिले आहे, जनमानसांची कामे केली आहेत तेव्हा कुठे जाऊन आम्ही आलो आहोत. दहा दिवसांच्या फराळाने कुणीही हुरळून जाण्याचे काम नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली.