राजकारण

Imtiaz Jalil : नामांतराचा सरकारी निर्णय मान्य नाही! मी औरंगाबादेत जन्मलो, तिथेच…, खासदार आक्रमक

Published by
Ahmednagarlive24 Office

Imtiaz Jalil : सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. असे असताना खासदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, सरकारे येतात आणि जातात, अनेक शहराची, रस्त्यांची बागांची नावे बदलण्याचे निर्णय त्यांच्याकडून घेतले जातात. अशा सरकारी निर्णयांना आमचा कायम विरोध राहिला आहे आणि यापुढेही तो राहील.

मी औरंगाबादेत जन्मलो आहे आणि तिथेच मरणार, असे म्हणत त्यांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, प्रकरण न्यायालयात असतांना केंद्र सरकार नामांतराचा निर्णय कसे घेऊ शकते?

नाव बदलली जातील, बोर्ड बदलतील पण इतिहास कसा बदलाल? इतिहास कधीच मिटवता येत नाही. ज्या शहरात माझा जन्म झाला ते औरंगाबाद शहर जगाच्या नकाशावर एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. ती ओळख तुम्ही मिटवू शकत नाही, असेही ते म्हणाले.

यामुळे आता यावरून भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा नामांतराच्या माध्यमातून भाजप घाणेरडे राजकारण करत आहे. त्यांचे हे राजकारणच लोकांसमोर आणण्याची आपल्यावर जबाबदारी आहे.

पुढील काळात ती आपल्याला एकजुटीने पार पाडावी लागले, असेही ते म्हणाले. नाव बदलून शहरातील परिस्थितीत बदलणार आहे का? लोकांना दररोज पाणी, चांगले रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा मिळणार आहेत का? असेही ते म्हणाले.

दरम्यान, औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. यासह उस्मानाबादचे देखील नाव बदलले आहे. यामुळे काहींनी स्वागत केले तर काहींनी याला विरोध केला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Ahmednagarlive24 Office