Jitendra Awad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आव्हाड कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित ऑडिओ क्लिप ही ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप आहे. याच आरोपांतून जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. यामुळे ठाण्यात मोठा राडा बघायला मिळाला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
असे असताना जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आव्हाडांवर आहे. यामुळे आता ते अडचणीत आले आहेत.
या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्या आहेत.रात्री ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नौपाडा पोलीस दाखल झाले होते.
पोलीस कार्यालयात दाखल झाले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील कार्यालयाबाहेर गाडीत बसले होते. पोलीस हे आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.