Karjat Jamkhed News : अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ एक हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे. कारण असे की, या मतदारसंघात महायुतीकडून माजी मंत्री तथा विधान परिषद आमदार राम शिंदे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होणार आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटाच्या उमेदवारांकडून गत काही दिवसांपासून मोर्चे बांधणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मतदार संघातील रोहित पवार यांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रामा भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.
यामुळे रामाभाऊंचे राजकीय वजन वाढले आहे. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते आहेत. यामुळे स्वतः फडणवीस यांच्या या मतदारसंघाकडे लक्ष आहे. दुसरीकडे राम शिंदे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे.
याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे राशीन येथे येणार आहेत. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे 7 नोव्हेंबरला राशीन येथे येणार आहेत. या दिवशी सकाळी 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.
त्यामुळे या सभेकडे मतदार संघाच्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे. या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने येथील लढत ही दुरंगीच आहे.
रोहित पवार आणि राम शिंदे या दोन नेत्यांमध्ये येथे खरी फाईट होणार आहे. गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असल्याने या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतलेली आहे.
संपूर्ण मतदारसंघ रामाभाऊंनी अक्षरशा पिंजून काढला आहे. गुरूवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी राशिन येथील भोलेनाथ चौक ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता रामाभाऊंच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न होणार असून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते ज्योतिरादित्य शिंदे हजेरी लावणार आहेत.
यामुळे या जाहीर सभेकडे संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. खरे तर मतदार संघातील महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रामा भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.
पण राशीन येथील भारतीय जनता पक्षाचे नेते राजेंद्र देशमुख यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला आहे. राजेंद्र देशमुख यांनी पक्षाला जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर या परिसरावर रामाभाऊंनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राशीन येथे भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रँड नेते ज्योतिरादित्य शिंदे राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सात नोव्हेंबरला हजेरी लावणार आहेत.
यामुळे या जाहीर सभेला अधिकाधिक लोकांनी हजेरी लावावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रयत क्रांती पक्ष सह महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांनी केले आहे.