‘कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी लढत होणार, या लंफग्याला बारामतीला पाठवा’ ; रोहित पवारांवर कोणी केली जहरी टिका ?

सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांचे सहकारी प्रा मधुकर राळेभात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राळेभात यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राळेभात यांनी, 'ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्याप्रति त्याची द्वेषाची भावना आहे.

Tejas B Shelar
Published:
Karjat Jamkhed Vidhansabha 2024

Karjat Jamkhed Vidhansabha 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीकडे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता महायुती सज्ज झाली आहे. महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. कर्जत जामखेड मध्ये देखील महायुतीचे नेते सक्रिय झाले आहेत.

अजून महायुतीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र यंदाच्या निवडणुकीत कर्जत जामखेड मधून महायुतीकडून भाजपाचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता दाट आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा माजी मंत्री राम शिंदे यांना तिकीट देणार असे म्हटले जात आहे.

सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांचे सहकारी प्रा मधुकर राळेभात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राळेभात यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राळेभात यांनी, ‘ज्या अजितदादांनी रोहित पवारांना मोठं केलं त्यांच्याप्रति त्याची द्वेषाची भावना आहे.

जेष्ठ माणसालाही तो चंगुमंगु म्हणतो, मग तुम्ही-आम्ही कोण ? यंदा कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरूध्द लफंगा असा सामना होणार आहे. रोहित पवार हा लफंगा असून हा लफंगा तिकडून येऊन आपल्याकडे मतं मागत फिरतोय, या लंफग्याला बारामतीला पाठवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे’, असे म्हणतं रोहित पवारांवर जहरी टीका केली आहे.

सध्या महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि माजी मंत्री राम शिंदे हे मतदार संघात फिरत आहेत. जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत मतदारसंघाचा बहुतांशी भाग पिंजून काढला आहे. अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. प्रचाराला सुरुवातही झालेली नाही.

मात्र राम शिंदे यांनी प्रचार सुरू केला आहे. शिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून मतदार संघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. ही पदयात्रा त्यांना सत्तेच्या चाव्या देऊ शकते. यामुळे या पदयात्रेकडे शिंदे यांनी संपूर्ण लक्ष केंद्रित केले असून याच्या माध्यमातून त्यांनी मतपेरणीला सुरुवात केली आहे.

महत्त्वाचे म्हणजे शिंदे यांच्या या पदयात्रेला मतदारसंघातून चांगला रिस्पॉन्स देखील मिळत आहे. या पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता जवळा गावात झाली. यावेळी बोलतांना ‘कर्जत-जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी लढत होणार, या लंफग्याला बारामतीला पाठवा’ असे म्हणतं भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना राळेभात यांनी, रोहित पवारांना कुकडीचे पाणी जामखेड मध्ये आणता आले नाही, एकाही तरुणाला नोकरी लावली नाही, त्यांना एमआयडीसी मंजूर करता आली नाही, मात्र भूमिपुत्र राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजूर करूनच आणली.

आपला तो आपलाच असतो हे रामा भाऊंनी दाखवून दिले असे राळेभात यांनी यावेळी म्हटले. रोहित पवार यांनी गेल्या पाच वर्षात जनतेची फसवणूक केली आहे असे म्हणत राळेभात यांनी गेल्या पाच दिवसात मी मतदार संघातील 85 हुन अधिक गावात फिरलो असून यावेळी मला राम शिंदे यांचा निधी प्रत्येक गावात जास्त असल्याचे दिसले आहे.

अनेक गावात रोहित पवारांचा निधी पोहोचला नसल्याचाही आरोप राळेभात यांनी यावेळी केलाय. पुढे बोलतांना रोहित पवारांचा विकास म्हणजे चॉकलेट, पॅड, सीएसआरमधून सायकली वाटणं, मोकळ्या कंपासी देणं हाच होय, याचीच जाहिरातबाजी करून ते खूप काही केल्याचा दावा करतात, जनतेची दिशाभूल करतात, अशा शब्दात राळेभात यांनी रोहित पवारांचा समाचार घेतलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe