Karjat Jamkhed Vidhansabha Matdarsangh : सध्या देशात दीपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात दिवाळीच्या सणासोबतच निवडणुकांचा देखील हंगाम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार रोहित पवारांची साथ सोडत राम शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे यांना भाजपाने संधी दिली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे विद्यमान आ. रोहित पवार हे निवडणुकीत उभे आहेत. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून सध्या निवडणुकीचा प्रचार मोठ्या जल्लोषात सुरू आहे.
हे उभय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले आहेत. पण या निवडणुकीच्या काळात विद्यमान आमदार रोहित पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी रोहित पवारांची साथ सोडली आहे. विधान परिषद आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.
यामुळे मात्र मतदारसंघात रोहित पवारांची पकड ढील्ली होत आहे. दुसरीकडे राम शिंदे यांची राजकीय ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील करमनवाडीमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का बसला असून येथील सरपंच, उपसरपंच, तीन ग्रामपंचायत सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी विद्यमान आमदार रोहित पवार यांच्या हुकुमशाही कारभाराला कंटाळून आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.
संपूर्ण करमनवाडी गावाने राम शिंदे यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. हा पक्षप्रवेश सोहळा चौंडी येथे मध्यरात्री संपन्न झाला असून यामुळे रामा भाऊंची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला बाजार समिती संचालक मंगेश दादा जगताप, माजी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा देशमुखवाडीचे माजी सरपंच बंडाभाऊ मोढळे, विजय पोटरे, शिवाजी चोरमले, अनिल गदादे, माजी सभापती प्रकाश शिंदे, पांडुरंग उबाळे सह इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
ऐन निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला असल्याने रामाभाऊंची राजकीय ताकद वाढली असून याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
कोणी-कोणी पक्ष प्रवेश केला ?
करमनवाडीचे सरपंच किसनराव रामचंद्र पुणेकर, उपसरपंच अमोल सायकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन खराडे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश पुणेकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन पावणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप पावणे, भानुदास पावणे, गोरख पावणे, रावसाहेब पुणेकर, अनिल पुणेकर, सतिश पुणेकर, यांच्यासह सोमनाथ बोराटे, सागर सायकर, विशाल सायकर, समाधान सायकर, ओम सायकर, प्राजक्त सायकर, संदिप पवार, संभाजी पवार, दिलीप पावणे, अनिकेत पुणेकर, मयुर पुणेकर, तानाजी पवार, श्रीकांत पावणे, गणपत सायकर, गणेश पुणेकर, दादा पवार, शरद पावणे, राजु सायकर, तानाजी पवार, अक्षय पावणे, ऋषीकेश सायकर, राजु पावणे, सनी पावणे, भानुदास पावणे, अशोक सायकर, रखमाजी महारनवर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे.