महाराष्ट्रात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. तीन तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आणखी दोन टप्पे मतदान शिल्लक आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.
दरम्यान आता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजला आहे. लोकसभा झाली की लगेच या निवडणूक होतील. त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.
कोणत्या जागेंवर मतदान ?
राज्य विधान परिषदेच्या जागांसाठी मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात ही निवडणूक होईल. मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघाचा तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा यात समावेश असल्याची माहिती समजली आहे. 7 जुलै रोजी या चारही आमदारांचा कार्यकाळ संपुष्ठात येईल.
कधी मतदान?
या जागेंसाठी 10 जून रोजी मतदान होईल. 7 जुलै रोजी या चारही आमदारांचा कार्यकाळ संपुष्ठात येईल. दहा जून रोजी राज्यात मतदान झाल्यानंतर 13 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
कोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपणार ?
मुंबई पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाचे विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील ठाकरे गटाचे किशोर भिकाजी दराडे, मुंबई शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील या आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे.
‘असा’ असेल निवडणूक कार्यक्रम
15 मे ला निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होईल. 22 मे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. 24 मे ला अर्जाची छाननी व 27 मे ला अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल. 10 जूनला मतदान होईन 13 जूनला मतमोजणी होणार आहे.