Mahadev Jankar : भाजपचे टेन्शन वाढलं! जागावाटपावरून राज्यातला मोठा पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत, दिला इशारा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadev Jankar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी केलेल्या जागा वाटपाच्या विधानावरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपा २४० लढवेन, तर शिवसेनेला ४८ जागा देऊ, असे वक्तव्य बावनकुळेंनी केले होते. यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

ते म्हणाले, भाजपाला आमची गरज नसेल, तर स्वतंत्र लढणार, असल्याचे त्यांनी सांगून टाकले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. जानकर म्हणाले, आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. महाराष्ट्रात माझे दोन आमदार आहेत. ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ सभापती, आसाम आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १ जिल्हा परिषद सदस्य आहेत.

तसेच गुजरातमध्ये २८ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपाला आमची गरज वाटत नसेल, तर आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ते म्हणाले, चार राज्यात तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळाली आहे.

आम्ही भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला बरोबर घेतील. नसेल तर आमचा रस्ता वेगळा आहे. भाजपाकडे आम्ही पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तेथील जागाच मागत आहोत, असेही जानकर यांनी सांगितले आहे.

तसेच एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत. आमच्या ताकदीवर ४८ लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे, असेही जानकर यांनी सांगितले. यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.