राजकारण

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी सुरू केली !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील प्रमुख नेत्यांकडे विविध लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे, तर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे विशेष बैठक आयोजित केली होती.

त्यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. त्यानुसार आता पक्षाकडून काही नेत्यांवर प्रमुख लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नेत्यांना मतदारसंघाचा प्राथमिक आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नांदगावकर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर पुणे, बाबू वागस्कर यांच्याकडे शिरुर, वसंत मोरे यांच्याकडे बारामती, मावळची जबाबदारी अमेय खोपकर, आमदार राजू पाटील यांच्याकडे कल्याण,

संदीप देशपांडे यांच्यावर रायगड, किशोर शिंदे यांच्याकडे नाशिक आदी लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे, पालघर, भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकट्या अविनाश जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office