Maharashtra Politics : खासदार विशाल पाटील यांचा जयंत पाटलांना सूचक इशारा ! आमदार रोहित पवारांना पक्षात मोठे पद मिळणार ?

Pragati
Published:

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले. मात्र तरी देखील लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ८ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आगामी विधानसभेला देखील ते मोठ्या ताकदीने सामोरे जाणार आहेत. मात्र आता या पक्षात अंतर्गत वाद सुरू असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन पक्ष निर्माण झाले. मात्र तेरी देखील लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी जंगी प्रचार करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे १० पैकी ८ जागांवर उमेदवार निवडून आनले. दरम्यान नुकत्याच नगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षात अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसून आले.

त्यात सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदार संघात येत अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्षात काहीतरी हालचाली होत असल्याच्या चर्चा होत आहेत.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर लोकसभेचा विजय हा वरिष्ठ नेत्यांनी न डगमगता उघडपणे केलेल्या संघर्षाचा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा आणि स्वाभिमानी जनतेचा असल्याचे म्हटले होते. तसेच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात देखील काही नेत्यांनी दोन दगडावर पाय ठेवले असून त्यांनी एकत्र इकडे यावे किंवा तिकडे जावे असे म्हटले होते.

तर दुसरीकडे याचसभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले होते की, अनेकांचे माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे महिने याआधी मोजून झाले आहेत. आता पुढचे चार महिने मोजू नका. कारण आता निवडणूक आहे. जाहीरपणे बोलायचे बंद करा. कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी शरद पवार यांना भेटावे त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. यावेळी दोघांनी केवळ अप्रतक्ष्य टीका केली होती. मात्र या टीका टिप्पण्णीमुळे पक्षात काहीतरी धुसफूस सुरु असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष उघडपणे दिसून आला.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आमदार रोहित पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर दिवंगत नेते आर.आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना देखील जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदार संघात येत अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना, तुमच्या गावात येऊन सत्कार स्विकारतोय, यावरुन तुम्ही ओळखले पाहिजे आहे. पुढची दिशा काय असणार आहे. असं सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेच प्रदेशाध्यक्ष पद राहणार कि अजून काही याबाबत याकडेच सर्वाचं लक्ष लागले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe