Maharashtra Politics : महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षाच्या फुटी नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एक वेगळा निकाल पाहायला मिळाला होता.
दरम्यान आता दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होणार असून या निवडणुकांकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. खरे तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला.
त्यावेळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पक्ष आघाडीमध्ये एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यात आणखी एक मोठा राजकीय भूकंप झाला तो म्हणजे महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष विभाजले गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झालेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार गट असे दोन गट तयार झालेत.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट तयार झालेत. या दोन पक्षाच्या फुटी नंतर अजित पवार गट आणि शिंदे गट हे सत्तेत भारतीय जनता पक्ष समवेत एकत्र बसलेले आहेत.
या घटनेनंतर जे विरोधी पक्षात होते ते मंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहू लागलेत. केवळ सत्तेसाठी पक्षासोबत अनेकांनी बंडखोरी केली. दरम्यान आता या साऱ्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका होत असून या निवडणुकांकडे राजकीय विश्लेषकांचे मोठे बारीक लक्ष आहे.
दरम्यान याच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी एक मोठे विधान केले आहे. मलिक यांच्या विधानानंतर आता महाराष्ट्रात निवडणुकीनंतर पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार की काय अशा चर्चांनी जोर पकडला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर कोणता पक्ष कुठे असेल हे आत्ताच सांगता येणार नाही अशी शक्यता अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.
म्हणून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतो अशा चर्चांनी जोर पकडला आहे. नवाब मलिक यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
नवाब मलिक यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक मोठंमोठे दावे केलेत. ते म्हणालेत की, ‘निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येणार नाहीये. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे.
अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता ? लोकांना कसे कसे पकडून आणले ? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे.’
दरम्यान नवाब मलिक यांच्या या विधानानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. तथापि विधानसभा निवडणुकीनंतर खरच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.