Maharashtra politics : सत्तासंघर्ष प्रकरणात आज सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत आज कोर्टात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. याबाबत अनेक दिवसांमध्ये केवळ तारीख सांगितली जात होती.
आता आज काय होणार यावर अनेक गणित अवलंबून आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन्ही गटांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. काल दोन्ही गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला.
कोर्ट आता हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करु शकते किंवा अंतिम निकाल जाहीर करु शकते. याबाबत सकाळी 11 वाजेपर्यंत सुनावणी सुरू होणार आहे. यामध्ये 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचे अधिकार यावर निकाल येणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून या खटल्याची सुनावणी आता सात सदस्यीय घटनापीठासमोर व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता या निकालावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. यामुळे शिंदे गट देखील याकडे लक्ष देऊन आहे. हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर हे सरकार पडू शकते असेही सांगितले जात आहे.
यामुळे या निकालावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट दावे करत असले तरी याबाबत आजच निकाल पुढे येणार आहे. यामुळे याकडे सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.