महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार! कोणता पक्ष किती जागा लढवणार? समोर आली मोठी अपडेट

विधानसभा निवडणुका शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट एकत्रित लढणार आहेत. तसेच ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट आगामी विधानसभा एकत्रितपणे लढणार आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024

Maharashtra Vidhansabha Nivdnuk 2024 : महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाचणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा थरार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या आगामी विधानसभा निवडणूकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गट एकत्रित लढणार आहेत.

तसेच ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट आगामी विधानसभा एकत्रितपणे लढणार आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे.

दोन्ही गटांचे जागावाटप अजून फायनल झालेले नाही मात्र लवकरच हे जागावाटप अंतिम होईल आणि या दोन्ही गटांमधील उमेदवारांची यादी सार्वजनिक केली जाईल असे म्हटले जात आहे.

दरम्यान, आज आपण महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे घटक पक्ष आणि महायुतीमध्ये समाविष्ट असणारे घटक पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पक्षाला किती जागा

महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघापैकी 220 जागांवर आघाडी मधील सर्व घटक पक्षांचे एकमत झालेले आहे. मात्र राजधानी मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर अजून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. पण, लवकरच या जागांचा निपटारा लागणार आहे.

सध्या सूत्रांकडून जी माहिती समोर येत आहे त्यानुसार, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे काँग्रेस ११०, ठाकरे ९० ते १०० आणि शरद पवार ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता आहे. याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु पुढील आठवड्यात जागावाटपाबाबत अधिकृत माहिती समोर येईल.

महायुती बाबत जर बोलायचं झालं तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला हा जवळपास ठरलेला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची नावे आपल्यासमोर येणार आहेत.

सध्या सूत्रांकडून जी माहिती प्राप्त झाली आहे त्यावर जर विश्वास ठेवला तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १२६, शिंदे गट ९० आणि अजित पवार गट ७२ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

अर्थातच भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी राज्य विधानसभेच्या २८८ जागांपैकी कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याबाबत एकमत झाले आहे. तथापि अद्याप महायुतीकडून उमेदवारांची अधिकृत यादी समोर आलेली नाही. पण लवकरच ही यादी समोर येईल असे दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe