Mahavikas Aaghadi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागावाटपाससंदर्भात चर्चा सुरू आहे. अशातच मात्र महाविकास आघाडीच्या खेम्यामधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
खरंतर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीत आहेत. हे तिन्ही पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पण अशातच काँग्रेसचे नेते अभिजीत वंजारी यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवू शकते, असे संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीत जागा वाटपा संदर्भात बंददाराआड चर्चा सुरु आहे. मात्र असे असताना काँग्रेसचे नेते अभिजीत वंजारी यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या आजपासून मुलाखती होणार असे म्हटले आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. परंतु काँग्रेसचा 288 विधानसभा मतदारसंघासाठीचा निवडणुकीचा प्लॅन तयार आहे असा दावा वंजारी यांनी केला आहे. खरंतर काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचा एक भाग आहे.
मात्र अभिजीत वंजारी यांच्या या दाव्यावरून काँग्रेसकडून 288 जागांसाठी तयारी सुरू असल्याचे समजते. यामुळे ऐन निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीत बिघाड झाला आहे का, काँग्रेस यंदाची निवडणूक स्वबळावर लढवणार का? असे काही प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
काँग्रेस खरंच स्वबळावर निवडणूक लढवणार की महाविकास आघाडी मधील इतर घटक पक्षांवर दबाव बनवण्यासाठी पक्षाकडून हे दबाव तंत्र अवलंबले जात आहे हा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र या साऱ्या प्रश्नांचे उत्तर येत्या काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे.
वंजारी काय म्हणालेत?
वंजारी यांनी सांगितल्याप्रमाणे, आमचे नेते आजपासून वेगवेगळ्या मतदारसंघात जाणार आहेत. मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुकांचे म्हणणे ऐकले जाणार आहे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अहवाल घेतले जातील.
मग, 288 मतदारसंघांचा अहवाल वरिष्ठांना दिले जाणार आहेत. एवढेच नाही तर वंजारी यांनी 288 मतदारसंघात आमचे उमेदवार तयार आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुलाखती घेणार आहोत.
सध्या, चाचपणी करतोय, मग अहवाल तयार करणार आहोत, असे म्हणतं काँग्रेसने 288 जागांसाठी तयारी सुरू केली असल्याचा दावा ठोकला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खरंच काँग्रेस स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.