Ahmednagar Politics : लोकसभेच्या ४८ पैकी ३६ जागांचे महाविकास आघाडीचे वाटप ! अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच, शरद पवारांकडे लक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : आगामी लकसभेच्या अनुशंघाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात लढत असेल. महायुतीच्या जागेबाबत अजून काही अपडेट नसल्या तरी महाविकास आघाडीचे मात्र ४८ पैकी ३६ जागांबाबत एकमत झाले आहे आहे.

विशेष म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादीकडे असणार आहे. शिर्डीबाबत मात्र अद्याप एकमत झाले नाही अशी माहिती मिळाली आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आल्याने आता या जागेवर शरद पवार गट कोणाला रिंगणात उतरवणार याकडे नगरकरांचे लागले आहे.

१३ जागांवर चर्चा सुरू

लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत एकमत होणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण याआधी काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण असायचे. परंतु आता यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना देखील समाविष्ठ आहे.

परंतु आता या आघाडीला जागावाटपावर एकमत घडवण्यात काही अंश यश आले असल्याची माहिती मिळाली आहे. ३६ जागांवर एकमत असून १३ जागांवर चर्चा सुरू आहे. एकमत झालेल्या जागांची यादी अद्याप जाहीर नसली तरी त्यात नगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली असल्याची माहिती मिळाली आहे.

 तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा

अहमदनगर लोकसभा मतदार संघात २००९ पासून राष्ट्रवादीला यश मिळाले नसल्याचे दिसते. तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा राहिला असून २०१९ मध्ये डॉ. सुजय विखे हे भाजकडून खासदार झाले आहेत.

नगरची जागा काँग्रेसला मिळावी असा सूर काँग्रेसमधून होता परंतु राष्ट्रवादी जागा सोडण्यास तयारी नव्हती त्यामुळे आता नगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असेल यावर एकमत झाल्याचे समजते.

उमेदवार आ.लंके की आ. तनपुरे ?

अहमदनगर मध्ये राष्ट्रवादीकडून आ. प्राजक्त तनपुरेंचे नाव आघाडीवर आहे. परंतु अजित पवार गटाचे आ. नीलेश लंके हेच, शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशीही चर्चा सध्या एक गट खासगीत सांगत आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसकडे जाणार की शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लढवणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता दक्षिणेत कोणता उमेदवार असेल याकडे लक्ष लागले आहे.