Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Mamata Banerjee : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसणार, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

Mamata Banerjee : : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान, केंद्र सरकारने थकवलेला निधी दिला नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांसाठी उपोषणाला बसल्या आहेत. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे. केंद्रात अनेकवेळा मंत्री राहिली आहे. आता भाजपावाले मला संविधान शिकवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मी एक मुख्यमंत्री आहे. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल. ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांचा उल्लेख ‘नंदलाल ओ नंदलाल’ असा केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, माझ्या उपोषणाने लोकांना त्रास होण्याचं कारण काय?, असा सवालही ममता बॅनर्जींनी उपस्थित केला आहे. मी रामनवमीच्या रॅली थांबवणार नाही. पण, जर कोणत्याही मुस्लिमाच्या घरावर हल्ला झाला, तर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

एक नेता सांगत आहे की, ते रामनवमीच्या रॅलीत हत्यार घेऊन चालणार, हे खपवून घेणार नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष आहे, अशी टीका देखील केली आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.