राजकारण

Manish Dhuri : मनसेला सर्वात मोठा धक्का! मुंबईत मसल मॅनचा सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Manish Dhuri : मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फटका देखील बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या मसल मॅनने पक्षातील सर्व पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे. असे असताना त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं म्हटले आहे. मात्र त्यांनी का राजीनामा दिला, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

दरम्यान, मनीष धुरी मनसेचे अंधेरी विभाग अध्यक्ष आहेत. धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक आहेत. पहिल्यापासून ते राज ठाकरे यांचे समर्थन मानले जातात. मनसेच्या अनेक आंदोलनात ते पुढे असायचे.

त्यांनी सध्या राज ठाकरे यांना पत्र पाठवून सर्वच पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. आता धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. मनसेनेही मुंबईतील संघटना बांधणीवर प्रचंड भर दिला आहे. असे असताना धुरी यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, वपश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजीमुळेच धुरी यांनी राजीनामा दिल्याची कुजबुज आहे. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दलही त्यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office