राजकारण

Manish Sisodiya : ब्रेकिंग! दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना अटक, केजरीवालांना मोठा धक्का

Published by
Ahmednagarlive24 Office

Manish Sisodiya : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदियांना यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कथित मद्य घोट्याळ्याबाबत तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने त्यांना अटक केली आहे. यामुळे याचा मोठा धक्का आम आदमीला बसू शकतो.

याप्रकरणामध्ये त्यांची या आधीही चौकशी झाली होती. आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या कारवाईची कुणकुण सिसोदिया आणि आम आदमी पक्षाला याआधीच लागली होती. अखेर सीबाआयाने त्यांना अटक केली आहे. आम आदमी पार्टीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

केजरीवाल यांनी देशात पारदर्शक कारभाराचे आश्वासन देवून अनेक ठिकाणी सत्ता मिळवली. यामध्ये दिल्ली चा समावेश आहे. मात्र याच ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक होत आहे. दिल्ली सरकाराचं जे मद्य धोरण होतं, या धोरणात काही बदल करून ठराविक, विशिष्ट घटकाला फायदा मिळवून देण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

यामुळे आता याची चर्चा सुरू आहे. हे सगळं प्रकरण आता पुढील काळात वेगवेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. चौकशीपूर्वी मनीष सिसोदिया यांनी आपल्याला अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. यासोबतच काही महिने आतमध्ये जावे लागेल, अशी भीतीही सिसोदिया यांनी व्यक्त केली होती.

सीबीआयने सिसोदिया यांची 8 तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच सिसोदिया यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांची 8 तास चौकशी करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office