राजकारण

शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात ! मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या महिलेचा जरांगे पाटील यांच्यावर मोठा आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Sangita Wankhede On Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकवटण्याचे काम केले आहे. पाटील यांच्यामुळे मराठा आरक्षण आता खऱ्या अर्थाने निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे.

शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत कुणबी वगळता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. याबाबतचा निर्णय विशेष अधिवेशनात घेण्यात आला आहे.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या लोकांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबीमधुन आरक्षण दिले गेले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे.

मात्र अशातच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काल अजय महाराज बारसकर यांनी पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या एका महिलेने त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

मनोज पाटील यांचा बोलविता धनी राज्यातील एक बडा नेता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनात सहभागी असलेल्या आणि मनोज पाटील यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी हे आरोप केले आहेत.

शरद पवार जसं बोलतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात
संगीता वानखेडे यांनी मुंबईकडे निघालेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांचाच फोन येत होता. पुढे त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळणार होतं यामुळे काही गोष्टींकडे कानाडोळा केला गेला असे म्हटले.

तसेच पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, असे म्हटले आहे. शिवाय शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे शरद पवार यांचेच ऐकतात असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला असल्याने सध्या यावरून मोठे वाद-विवाद पाहायला मिळत आहेत.

दरम्यान संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं, अंतरवलीत दंगल घडली का घडवली गेली ? सरकारने शोध लावावा,

असे देखील यावेळी म्हटले आहे. तसेच आधी मी जरांगे पाटील यांच्या समवेत होते मात्र आता मी त्यांचा विरोध करत आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.

मनोज जरांगे पाटील कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, त्यांना मनोज पाटील विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असं संगिता वानखेडे यांनी यावेळी म्हटले आहे.

म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी शरद पवार हे आहेत असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. यामुळे आता जरांगे पाटील वानखेडे यांच्या आरोपांवर काय उत्तर देतात हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24