राजकारण

Loksabha Elections : डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Loksabha Elections :  केंद्रातील सत्तारूढ भाजप चालू वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणूक घेईल, असे भाकित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केले. भाजपने आपल्या निवडणूक प्रचारासाठी सर्व हेलिकॉप्टर्स बुक केल्याचा दावा ममतांनी केला.

भाजपला केंद्रातील सत्तेचा तिसरा कार्यकाळ मिळाला तर देशात निरंकुश राजवट येण्याचा धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या युवा आघाडीच्या सभेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपने अगोदरच कटुतामय समाज असलेला देश बनवला आहे.

त्यातच येत्या डिसेंबर महिन्यात लोकसभेची मध्यावधी निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपने आतापासूनच हेलिकॉप्टरची बुकिंग केली आहे. इतर राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स मिळू नयेत, असा भाजपचा कुटील डाव आहे. पण, यदाकदा भाजप पुन्हा सत्तेत आली तर आपला देश द्वेषवादी बनेल, असा इशारा ममतांनी दिला.

विरोधकांना ठणकावले

यादवपूर विद्यापीठात ‘गोली मारो’चे नारे देणारी ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ व भाजप कार्यकर्त्यांवर ममता बॅनर्जीनी तोफ डागली. विद्यापीठ परिसरात द्वेष पसरवणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. द्वेष वाढवणाऱ्या घोषणा देण्यासाठी हा काही उत्तरप्रदेश नव्हे तर पश्चिम बंगाल आहे, असेही त्यांनी ठणकावले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office