राजकारण

मंत्री धनंजय मुंडेंना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले ! आ. बाळासाहेब थोरात,पंकजा मुंडेंची दवाखान्यात धाव

Published by
Ahmednagarlive24 Office

राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांचे पित्ताशय काढून टाकण्यात आले असल्याची माहिती समजली आहे.

मुंबईतील सर एच एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात ते आहेत. धनंजय मुंडे यांना मागील अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होत होता.

हा त्रास जास्तच वाढल्याने शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढून टाकण्यात आले. मुंबईतील सर एच एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाली.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,

तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. डॉक्टरांनी आणखी चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

धनंजय मुंडे यांचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामाची पद्धती व भाषणाची शैली यामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या तब्येत अस्वास्थ्याची बातमी समजताच कार्यकर्त्यांत चिंतेचे वातावरण होते.

दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती समजली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांची फोन करून चौकशी केली असल्याचे समजते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजताच कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.

Ahmednagarlive24 Office