Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणाच्या लाभधारकक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची वेळोवेळी मागणी केली असताना. कुकडी विभागाचे अभियंता किरण देशमुख यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत खोटी उत्तरे दिली व पाणी शिल्लक असताना देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले.
तसेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत शासनाविरेधात संताप निर्माण होईल असे कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आमदार राम शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या टंचाई बैठकीत केली होती.
मात्र याबाबत अद्याप कोणतीच कारवाई न केल्याने आमदार राम शिंदे हे आजपासून (दि.२०) जिल्ह्यधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उपोषणास बसणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणाच्या लाभधारकक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याची वेळोवेळी मागणी केली असताना.
आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिशाभूल केली व खोटी उत्तरे दिली आणि पाणी शिल्लक असुन देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले व शेतकऱ्यांचे नुकसान केले शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याचे बैठकीत ठरले होते.
त्याचसोबत निमगाव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीने तलाठी कार्यालयाची इमारत बांधकामासाठी नाहरकत दाखला मिळण्यासाठी २ वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केला होता. मात्र अद्याप या प्रस्तावावर कोणतीच कार्यवाही केली नाही.
याबाबत दप्तर दिरंगाई झाली असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
तरी कुकडी विभागाचे अभियंता किरण देशमुख यांच्यावर दप्तर दिरंगाई व तत्काळ निलंबनाची कारवाई करावी यासाठी मंगळवारी (दि.२०) आपल्या कार्यालयाच्या बाहेर उपोषण करणार असल्याचे निवेदन आमदार राम शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.