राजकारण

Ahmednagar Politics : आमदार तनपुरे आक्रमक ! म्हणाले सत्यनारायण घालण्याची वेळ या सरकारने आणली…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : सत्यनारायण घालण्याची वेळ या सरकारने आणली. माझ्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये सत्तेत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारमुळे आता या पुढे कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणून सत्यनारायणालाच साकडे घातले.

सर्वसामान्य जनतेची रखडलेली महत्त्वाची विकासकामे आता तरी तातडीने मार्गी लागावीत, यासाठी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते, असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या आरडगाव ते म्हसे-वने-इंगळेवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची सुरुवात काल सत्यनारायण पूजा आंदोलन करुण आ.तनपुरे यांनी केली.

पुढे बोलताना आ. तनपुरे म्हणाले, तालुक्यातील विकासकाम मार्गी लागावे. यासाठी न्यायालयाचे दरवाजे आम्हाला ठोठावे लागले होते. अखेर माझ्यासह गावकऱ्यांचे प्रयत्न फळले असल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

दुसरीकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील आरडगाव सबस्टेशन ते केंदळ बु-केंदळ खुदं ब्राम्हणी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रकल्पाप्रश्नी सत्ताधारी अद्यापही दिरंगाईच दाखवत आहेत, अशी टिकाही आ. तनपुरे यांनी केली.

माझ्या मतदारसंघातील विकासकामांमध्ये सत्तेत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारमुळे आता या पुढे कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणून सत्यनारायणालाच साकडे घातले. रखडलेले वीज- सौरऊर्जा-रस्ते असे कित्येक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी इतकी दिरंगाई का दाखवली जातेय? याचे उत्तर दिले नाही तर ही जनता तुम्हाला मतपेटीच्या रूपाने सडेतोड प्रत्युत्तर नक्की देईल, याची मला खात्री आहे.

यावेळी सुनील मोरे, भारत तारडे, नितीन काळे, राजू आढाव, रमेश वने, दिलीप इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी रस्त्याचे काम आता तरी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री व सौ. आदिनाथ ढेरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करून आ. तनपुरेंच्या हस्ते आरती केली.

यावेळी रविंद्र आढाव, सुरेश झुगे, बाळासाहेब पेरणे, शिवाजी आढाव, राजेंद्र आढाव, जालिंदर काळे, नामदेव तारडे, अण्णासाहेब देवरे, कैलास झुगे, भाऊसाहेब देशमुख, पोपट झुगे, बाळासाहेब म्हसे, मोहन खुरूद, भाऊसाहेब आढाव,

केशव म्हसे, बाबासाहेब म्हसे, चाँद शेख, सुरेश म्हसे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सचिन खुरूद, विक्रम पेरणे, सतीश म्हसे कानिफनाथ तारडे, आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office