शेवगावची जनता दडपशाहीला थारा देणार नाही ! आमदार मोनिका राजळे

Tejas B Shelar
Published:
Monika Rajale

शेवगाव : विकास प्रवाहात भेदाभेद न करता सर्वांना सामावून घ्यायचे असते. आपल्या संस्कृती व संस्कारामुळे आपण देखील हे पथ्य प्रामाणिकपणे जपले आहे. मात्र दहिगाव ने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे.

विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या . तरीही आपण दहिगावनेसह परिसरातील गावागावात मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन येथील कामे मार्गी लावली आहेत.

आता प्रत्येक गावात तरुण नेतृत्व उदयास येत आहेत. कोणाच्या दबावाला बळी पडू नका. मी आपणा सोबत असल्याचे आश्वासित करून आरोप करणारांना आपली कामे दाखवा. मित्रपक्षासह भाजपा कार्यकर्ते त्यांचे मनसुबे हाणून पाडतील अशी ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.

शहरटाकळी येथे मतदारांसी संवाद साधतांना आ .राजळे बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोढे, भिमराज सागडे, अमोल खरड, संदीप खरड, अनिल सुपेकर, सुभाष बरबडे, मोहनराव खंडागळे, रामाआप्पा गिरम, अशोक निंबाळकर, बाळासाहेब विखे, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार राजळे यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता महायुतीच्या शासनाकडून विरोधकांनी आपल्या कारखान्याला मोठी पदरात पाडून घेतली. मात्र त्याचे उतराई होण्या ऐवजी, मदत करण्याची भूमिका घेतली नाही, त्यांना त्याचा विसर पडला आहे. कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने काम करावे. आपण केलेल्या विकासकामाच्या आरशामुळे आपणास निवडणुक सोपी असल्याचे यावेळी आ राजळे म्हणाल्या .

शहरटाकळी गावात आमदार राजळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून मतदारांना भरभरुन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी राजळे यांचे फटाक्यांची आतषबाजी करुन स्वागत करण्यात आले.

गावं भेटी दरम्यान अनेक ठिकाणी लाडक्या बहिणीकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी लाडक्या बहिणींनी राजळे यांना आश्र्वस्त करत खंबीरपणे साथ देण्याचे आश्वासन दिले. गावागावात लाडक्या बहिणींकडून होणाऱ्या स्वागता मुळे दुसरीकडे विरोधकांची चिंता वाढल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe