राजकारण

नेवासा मतदारसंघ सेनेकडे घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली; भाजपमध्ये अंतर्गत वाद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : नेवासा मतदारसंघातुन बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेटे हे दोघेही भाजपकडून इच्छुक असले तरी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपच्या स्वप्नांवर विरजन पडेल की काय? याची शक्यताही नाकारता येत नाही… कारण शिंदेंनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

तर दुसरीकडे नेवासा विधानसभेसाठी भाजपाकडे असलेली ही जागा सेनेकडे घेण्यासाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरु केलेल्या असताना भाजपाच्या नेते मंडळीतच समन्वय नसल्याची कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली.

नुकतीच भाजपाचे राज्यसभा खासदार तथा केंद्रिय महामंत्री, निरीक्षक नैलेश शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा फाटा येथे संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची दुसऱ्यांदा आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, भाजपाचे युवानेते ऋषिकेश शेटे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निरीक्षक शहा यांच्यासमोर बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मते मांडतांना नेत्यांवर चांगलीच आगपाखड केली.

सध्या या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत शंकरराव गडाख आहेत. गडाख यांनी २०१९ ची विधानसभा अपक्ष लढवली व त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव करत निवडून आले.

पुढे गडाख यांनी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देत कॅबिनेट मंत्रीपद देखील पदरात पाडून घेतले. त्यामुळे यंदा ठाकरेंकडून शंकरराव गडाख तर भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे अशी लढत होणार असल्याचे चित्र दिसत असली तरी ता मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत.

तर महायुतीत असल्याने विधानसभेत भाजपकडून आपल्याला तिकीट फिक्स असे समजुन असलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांना मात्र आता धक्का बसला आहे कारण लोकसभा निवडणुकीत नेवासात शिवसेनेच्या शिंदे गटाला लीड मिळालं होते. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाने नेवासा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Ahmednagarlive24 Office