राजकारण

Ahmednagar Politics : नगरची जागा शिवसेनेलाच ठेवण्याच्या हालचाली.. शिवसेना ठाकरे गटाची नगरमध्ये आढावा बैठक संपन्न

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा राहिला आहे.

त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेसाठीही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने ही निवडणुक लढविणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. नगर शहर हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक जनतेच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेत आहेत, ही चांगली बाब आहे. स्व. अनिल राठोड यांचे या मतदारसंघावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ शिवसेनेकडे कसा राहील, यासाठी प्रयत्न करू. पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येतील. तसेच येणाऱ्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व कसे राहील, यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे यांनी केले. शिवसेना ठाकरे गटाचे नगर शहर विधानसभा संपर्कप्रमुख विलास घोगरे नगर येथे आले असता, त्यांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

नगरची जागा शिवसेनेलाच घ्यावी
घोगरे नगरमध्ये आले असता त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पक्षीय कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी त्यांना माहिती दिली. नगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री स्व. अनिल राठोड पाच वेळा निवडून आले होते त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, असा ठराव यावेळी करण्यात आला. युवा नेते विक्रम राठोड यांनी अनुमोदन दिले.

मनपा निवडणुकीत भगवा
यावेळी भगवान फुलसौंदर यांनी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा खासदार झाला आहे. त्यामुळे येणारी विधानसभा व मनपा निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. या वेळी विक्रम राठोड यांनी युवा सेनेच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन सुरु आहे. युवकांच्या प्रश्नांसाठी युवासेना कार्यरत असल्याचे सांगितले

 

Ahmednagarlive24 Office