राजकारण

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी शरद पवार गट राजकीय खेळींच्या तयारीत ! आ. तनपुरे ‘कामाला’ लागले, इतरांचे समर्थकही गळाला लावले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले व महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर राज्यात शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट पडले. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला.

पण अहमदनगर जिल्ह्यातही आ. रोहित पवार व आ. तनपुरे हे दोन आमदार सोडले तर बाकी सगळे अजित पवार गटात गेले. आता अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपले सांगतं मजबूत करण्यावर भर द्यायला सुरवात केली आहे.

आ. प्राजक्त तनपुरे यांनी त्यादृष्टीने पाऊले टाकायला सुरवात केलीये. याची सुरवात श्रीरामपुरातून त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची २२ डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली.

यावेळी आ. तनपुरे यांनी बैठकीला हजेरी लावणाऱ्या कार्यकत्यांना पाठबळ देत आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ताकद देण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी शहराध्यक्ष लकी सेठी,

पक्षाचे प्रवक्ते संदीप वर्षे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष आदिक, प्रकाश पाउलबुद्धे आदींची हजेरी होती.

विचार गुंडाळून ठेवले असते तर मंत्री असतो

यावेळी आ. तनपुरे यांनी सरकारवर मोठा घणाघात केला. ते म्हणाले, सहा महिन्यांपूर्वी आपणही सत्तेत जाऊ शकलो असतो मंत्रिपद घेता आले असते पण शेवटी आपला विचार गहाण ठेवायचा नाही असे ते म्हणाले.

सत्ता मिळते म्हणून आपले विचार गुंडाळून ठेवायचे नसतात असे सांगत मनाला पटले नाही म्हणून येथेच थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. या सरकारने निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न घटले आहे.

दूध व्यवसायातून शेतकऱ्याच्या हातात पैसे यायला लागले तर दुधाचेही भाव दहा रुपयांनी कमी केले. आता कुठे पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली तीही सहकारी संघांना दूध घालणाऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणारा केवळ एकच नेता,एकमेव कृषिमंत्री म्हणजे शरद पवार होय असे ते म्हणाले.

इतरांचे समर्थकही गळाला ?

या बैठकीला मुरकुटे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.त्यामुळे आता आ. तनपुरे यांनी इतरांचे समर्थकही गळाला लावण्यास सुरवात केली की तेच इकडे येणार आहेत यावर चर्चा सुरु होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office