राजकारण

Ahmednagar Politics : सेनेकडून भाजपच्या फसव्या घोषणांचा समाचार ! एका गावाला २९ कोटी रुपयांचा फटका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा या अभियानातर्गत ग्रामस्थांसोबत संवाद साधत भाजपाच्या फसव्या घोषणांचा समाचार घेण्यात आला.

या अभियानात उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, शिवसेना नेते इंजि. प्रवीण कोकाटे, युवा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कांडके, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, श्रीगोंदा शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे, सरपंच शरद पवार, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, कामधेनु पत संस्थेचे अध्यक्ष डॉ.ययाती फिसके आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून भाजपाच्या फसव्या घोषणांचा आणि वास्तव स्थितीची सविस्तर चर्चा केली. उपनेते पाचपुते यांनी आपल्या भाषणातून होऊ द्या चर्चा कार्यक्रमामागील शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली.

तसेच नगर तालुक्यात दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या अभियानात लोकांचा सहभाग मोठा असून भाजपा सरकारने आजवर जनतेला अनेक आश्वासने दिली. पण पूर्ण मात्र केली नाही. काही घोषणांबाबत त्या चुनावी जुमला होत्या असे म्हणुन लोकांची चेष्टा केली आहे. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त होत आहे.

ज्या सोशल मीडियाच्या जोरावर भाजपा सत्तेत आली त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पायउतारही होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी उपस्थितांसोबत चर्चा करत स्थानिक बाबींचा हिशोब मांडत फक्त चिचोंडी पाटील गावची भाजपा सरकारकडून होत असलेली लूट मासिक आणि वार्षिक लूटीचा तपशील मांडत लोकांना चिंतन करण्यास प्रवृत्त केले.

एकटया चिचोंडी गावचा हिशोब काढला तर सुमारे २९ कोटी रुपयांचा फटका भाजपा सरकारमुळे होत असल्याचा दावा त्यांनी केला. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवून त्यांची जागा दाखवुन द्या व सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपाच्या फसव्या घोषणाचे माहितीपत्रक वितरीत केले. त्यामध्ये प्रामुख्याने सत्तेत येण्यासाठी भाजपा नेत्यांनी १५ लाख रुपये प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात जमा होणार,

दरवर्षी १२ कोटी तरुणांना रोजगार देणार, , शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा परत आणणार, आमदार-खासदार गावे दत्तक घेऊन सुधारणा करणार, स्मार्ट सिटी करणार याशिवाय अन्य अनेक आश्वासनांची यादी प्रसिद्ध केली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office