Ahmednagar News : ना. विखे पाटील व माझा पक्ष एकच आहे, त्यामुळे आम्ही जिवा भावाने एकत्र राहतो. मात्र त्याचे दुख काही लोकांना होत असल्याचे दिसते, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
काल बुधवारी (दि.१०) राहुरी शहरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले कि, समाजात पत्रकारावरील विश्वास कायम आहे. बातमी करण्याचे काम कसरतीचे व कष्टाचे आहे.
प्रत्येक पत्रकाराची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. शेती व्यवसाय करून समाजात चांगली भूमिका पार पाडण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळेच दरवर्षी न चुकता पत्रकारांचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. तसेच पत्रकारा प्रमाणेच समाजातील प्रत्येक घटकाचा सत्कार करण्याचा आमचा परिवार प्रयत्न करत असतो.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, अनिल देशपांडे, वसंतराव झावरे, राजेंद्र वाडेकर, सुनील भुजाडी, गणेश हापसे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल जाधव, अनिल कोळसे, विलास कुलकर्णी,
मनोज साळवे, राजेंद्र म्हसे, श्रीकांत जाधव, ऋषी राऊत, आर. आर. जाधव, शरद पाचारणे, बंडू म्हसे, गणेश विधे, सतिष फुलसौंदर, संतोष जाधव, गोविंद फुणगे, सुहास जाधव, मिनाष पटेकर, शिवाजी घाडगे, प्रसाद मैड, सुनिल रासणे आदी उपस्थित होते.