Maharashtra Politics : गतिमान नव्हे, हे तर अवमेळ नसलेले सरकार : आ. तनपुरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Politics : शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात आघाडी सरकारने एक योजना आणली होती ती योजना या गतिमान सरकारने बंद केली, ती योजनाच बंद झाल्याचे मंत्र्यांना माहीत नव्हते, मग हे सरकार राज्याचे मंत्री चालवतात, की प्रशासनाचे अधिकारी कोण चालवित आहे ? असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला.

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आ. तनपुरे म्हणाले की, गतिमान सरकार जाहिरातीवर कोट्यवधी रुपये उधळीत आहे. मात्र, या गतिमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देता येईनात.

एका वर्षात अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकले नाही, शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईना, नविन सबस्टेशन, डिपी देण्याची एक योजना आघाडी सरकारने सुरु केली होती. या योजनेत दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना ही योजनाच या सरकारने बंद केली.

अशा अनेक योजनांची मंत्र्यांनाच माहिती नसते, अशा मंत्र्यांच्या वतीने अधिकारी माहिती देतात, त्यामुळे हे गतिमान सरकार नेमक कोण चालवित आहे, असा सवाल आमदार तनपुरेंनी या वेळी उपस्थित केला.

मतदार संघामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या गतिमान सरकारची जाहिरात मी एका शाळेवर पाहिली, त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते, आता पुढील वर्षी आणखी एखाद्या उपमुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याची वेळ या सरकारवर आली तर नवल वाटायला नको. – आमदार तनपुरे