Ahmednagar Politics : आता ‘हा बडा नेता दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक ! नागवडेंच्या पक्षबदलासह विखेंचाही घेतला समाचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा शंभर टक्के लढविणारच आहे, तसेच जर लोकसभेला भाजपविरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बीआरएसचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी येथे पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.

घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला, तर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून, देशात महागाई, बेरोजगारी निर्माण झाली आहे. शेतीमालाला भाव नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे.

सत्ताधाऱ्यांना सामान्य जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील. नगर दक्षिणच्या सत्ताधारी खासदारांनीही गतवर्षी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली; परंतु गेल्या पाच वर्षांत त्यांनी एकही शिबिर घेतले नाही.

यावरून आरोग्याचा प्रश्न संपला आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. साकळाई पाणी योजनाही रखडली आहे. सकाळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेले असतानाही गेल्या पाच वर्षांत कोणतेही काम झालेले नाही.

नागवडेंच्या पक्षबदलावरही भाष्य

श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे हे काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता शेलार म्हणाले, की गत विधानसभा निवडणुकीत नागवडे यांना निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले होते.

त्यावेळी त्यांनी कारखान्याची अडचण सांगितली होती. आता ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेले असून, दबावामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असावा, अशी शंका आहे.

इच्छुकांची यादी मोठी

सध्या अहमदनगर लोकसभा मतदार संघात लढणाऱ्यांच्या इच्छुकांची मोठी यादी झाली आहे. भाजप खा. सुजय विखे, भाजपचेच आ. राम शिंदे, राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके व आता घनशाम शेलार यांचेही नाव आता यात जोडले गेले आहे.

तसेच श्रीगोंदेमधून व इतर मतदार संघातून विधासभेसाठी देखील अनेक इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झालेली आहे.