Categories: राजकारण

भाजपचे पन्नासच आमदार निवडून येतील..वाचा काय म्हणाले एकनाथ खडसे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने राजकारण करून संपवण्यात आले हे सर्वश्रुत आहे. परंतु त्यावेळी ते शांत बसले कारण त्यांना विधानपरिषदेवर जाऊ अशी खात्री होती.

तशी मागणी त्यांनी केली होती. तसं त्यांना आश्वासनही मार्चमध्येच देण्यात आलं होतं. पण, त्यांचं नाव ऐनवेळी वगळण्यात आल्याने खडसे चांगलेच संतापले असून असेच वातावरण राहिले तर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यातील नेत्यांवर कडाडून टीका केली आहे. खडसे म्हणाले, विरोधी पक्षात एकटं असताना १२३ आमदार निवडून आणले. महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणला आणि सत्ता, पैसा सगळं असून १०५ आमदार आले. या प्रवृत्तीमुळे १०५ आमदार आले.

विरोधी पक्षात बसायची वेळही याच कारणामुळे आली. पुढे कष्टानं जावं लागणार आहे, नाहीतर १०५ आमदारांचे ५० आमदार व्हायला वेळ लागणार नाही,” असा घणाघाती हल्ला एकनाथ खडसे यांनी भाजपा राज्यातील नेत्यांवर केला.

“स्वतःकडे ज्यावेळस अधिकार येतात तेव्हा संघटनेला विश्वासात न घेता, मी पक्ष चालवतो, अशी भावना निर्माण होते. तेव्हा पक्षाची अशी वाताहत होते. आज भाजपाचं जे चित्र आहे, ते सामूहिक नाही.

संघटित नाही. एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतले जात नाही. इथं बहुजन समाजाच्या नेतृत्वाचं जर खच्चीकरण करत असाल, अशी विचित्र वागणूक जर मिळत असेल, तर पक्षाच्या वरिष्ठांकडे हे मांडण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

एखाद्या कुठल्यातरी व्यक्तीची हुकुमशाही चालवून घ्यायची आणि त्यांनीच निर्णय घ्यायचे. वरिष्ठांचे आशीर्वाद असल्यामुळे स्वतः सर्वस्वी समजायचं, हे जे भाजपात सुरू आहे. लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही,” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24