Ahmednagar Politics : आ. पाचपुते यांचा आ. लंकेंना सबुरीचा सल्ला ! कोणाचे ऐकू नका, आपण एकोप्याने राहू…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर लोकसभेचे अर्थात दक्षिणेचे निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सुजय विखेंविरोधात निलेश लंके एवढाच सूर पाहायला मिळत आहे.

दरम्यान नगर दक्षिणेतील एका कार्यक्रमात आ. नीलेश लंके हे भाषण करण्यासाठी जात असताना संयोजकांनी ‘नगर दक्षिणेचे ‘भावी खासदार’ असा त्यांचा उल्लेख केला.

विशेष म्हणजे यावेळी महायुतीचे अनेक घटक तेथे उपस्थित होते. त्यांचा असा उल्लेख झालेला पाहताच पुढे आ. बबन पाचपुते यांनी त्यांना आपल्या भाषणातून सबुरीचा सल्ला देत एकोप्याने राहण्याचा सल्ला दिला.

काय म्हणाले आ. बबनराव पाचपुते

माजी मंत्री, आ. बबनराव पाचपुते यांनी आपल्या भाषणातून आ. निलेश लंके यांना सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, आपण तरुण होतकरू आमदार आहात. मी पण तरुण होतो. नऊ वेळा विधानसभा लढवली. त्यात सात वेळा आमदार झालो, पण आपल्या कानात बोलणारे, आपल्याला सल्ला देणारे अनेक जण असतात, पण माझे ऐका, आपण कोणाचे ऐकू नका. सध्या आपण सर्व महायुतीत आहोत. जरा एकोपाने राहू असा कानमंत्र दिला.

या कार्यक्रमाला नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी आ. राहुल जगताप, बीआरएसचे अनिल घनवट, अण्णा शेलार, शहीद स्मारक समितीचे तालुकाध्यक्ष संदीप सांगळे, उपाध्यक्ष अनिल मते आदी मंडळी उपस्थित होती.

आ. निलेश लंके काय म्हणाले

आ. नीलेश लंके यांनी देखील यावेळी या कार्यक्रमात राजकीय वक्तव्य केले. ते म्हणाले, राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकत्यांना बरोबर घेतल्यास सैनिक त्यांनाही शिस्त लावतील. मी आमदार आहे.

आमदार-खासदारांना जास्त निधी देण्याचे अधिकार नाहीत, ते अधिवेशनात ठरतात. त्यामुळे मी अगोदर काम करतो आणि नंतरच बोलतो. नुसत्या घोषणा करणारा मी आमदार नसल्याचे आ. निलेश लंके म्हणाले.

 पाचपुतेंचा सल्ला लंके ऐकणार?

आ. पाचपुते यांनी निलेश लंके यांना एकोप्याने राहण्याचा सल्ला दिला. हा सल्ला आता निलेश लंके ऐकणार का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. एकीकडे ते महायुतीचे घटक आहेत. अजित दादांचे ते कट्टर समर्थक आहेत.

तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी लोकसभेचा वारंवार पुनरुच्चार करत आहेत. त्यामुळे आता आगामे काळात काय चित्र असणार याविषयी सामान्य जनता सध्या तर्क वितर्क लावत आहे.