औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की आमच्यासोबत संवाद साधला नाही. त्यांनी निर्णयाला विरोध केलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते आणि हा प्रस्ताव मंजूर झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शहरांची नावे बदलल्याने काही होत नसते. त्याचा काही उपयोग नाही. त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटची ठरलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्याविषयी आम्हाला माहिती नव्हते, परंतु मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा मंत्रिमंडळाचा आहे, असा मानण्याचा प्रघात आहे, असे म्हणत शरद पवारांनी शहरांच्या नामांतरावर आपली भूमिका मांडली होती.