Ahmednagar Politics : लोकप्रतिनिधी यांनी जनता द्रबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.
लोकप्रतिनिधीला सवड नसल्याने लोकांच्या आग्रहास्तव जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयात मलाच समस्या निवारण बैठक घ्यावी लागत असल्याचा गौप्यस्फोट कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला.
येथील तहसील कचेरीत सोमवारी आयोजित समस्या निवारण बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. यावेळी कांदा अनुदान व पिक विमा यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) ‘चालकाकडून होणारी शेतकऱ्याचे लूट तातडीने थांबवा, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले कौ,
शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कांदा अनुदानासाठी अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना तातडीने अनुदान द्यावे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केवळ १ रुपयात पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी कॉमन सव्हिस सेंटर (सीएससी) चालक शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.
तसेच कांदा अनुदान व पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अजिबात बेठीस धरू नये, अशी आग्रही मागणी तहसीलदारांकडे केली. बैठकीत कोल्हे वांनी पाणी, रस्ते, वीज, स्मशानभूमी, ‘शेतकर््यांना अनुदान, घरकुल, रेशनकाड ऑनलाईन करणे, समृध्दी महामागांच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरस्ती,
पाण्याचा निचरा, संजय गांधी निराधार वोजनेचे प्रलॅवित प्रस्ताव मंजूर करणे आदी अनेक महत्त्वाचे प्रश्न मोडले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व व मी जनहिताचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठ पुरावा करत असून, आजवर विकासाचे अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावले आहेत.
आजच्या बैठकीत मांडलेले प्रश्न त्वरित सुटले नाहीत, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधी यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अजिबात वचक राहीला नाही. त्यामुळे शासकीय अधिकारी, कर्मचारी मनमानी करीत आहेत. त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कांदा अनुदान व पिक विमा यासाठी लोकांना वेठीस धरले जात आहे. – विवेक कोल्हे, अध्यक्ष, कोल्हे कारखाना