पिंपळगाव वाघा येथे विठ्ल, रुक्मीणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, निळोबारायाच्या मंदिराची भव्य अशी उभारणी होणार आहे. दोन वर्षापासून येथे मंदिराचे काम काज चालू आहे. आठ एकरा मध्ये हे मंदिर उभे राहणार आहे मंदिरासाठी आमदार निलेश लंके यांनी पन्नास लाख रुपायाचे सभामंडप दिले आहे. पिंपळगाव वाघा हे गावा आता प्रति पंढरपूर संत पंढरीची म्हणून ओळखले होणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथे सभामडंपाच्या शुभारंभ प्रंसगी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी बाळनाथ गडाचे छ्ङ्गन महाराज, मनमाडचे सोमेश्वर महाराज, भगवान महाराज जंगले उपस्थित होते. यावेळी लंके म्हणाले महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे.
या भूमीत जे साधुसंत समाजासाठी झटले स्वतःला गाडून घेतले त्यांचीच जयंती साजरी होती. मात्र उद्योजकांची जयंती कधी साजरी होत नाही. भावी पिढी चांगली संस्कारीक घडवायची असेल तर गावोगावी गुरुकुल झाले पाहिजे.
जिल्हा परिषद तसेच इतर सर्व शाळा मध्ये एक हरीपठाचा तास झाला पाहीजे. यासाठी राज्य सरकारला मागणी करणार आहे. बुद्धीच्या जोरावर अधिकारी होऊ शकतात या बुद्धीला संस्कारची धर्माची जोड दिली तर सर्व सामन्याचे प्रश्न सोडू शकतात.
मतदार संघात गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था उभ्या करण्यासाठी प्रयत्न करणार. वारकरी शिक्षण संस्था झाल्या तर. पिढी बदलल्या शिवाय राहणार नाही. पिढी बदलण्याची ताकत धर्म, संस्कार सांप्रदयात मध्ये आहे. या मंदिरासाठी लागणारी जागा हि लोकसहभागातून उभी केली आहे.
मंदिराचे कामकाज हे दगड बांधकामात होणार आहे. भव्य असे मंदिर नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा येथे उभे राहणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन कुरे महाराज नानेकर महाराज यांनी केले. समारोप अमोल वाबळे यांनी केला.
या कार्यक्रमासाठी अजय लामखडे, अरुण फलके, भरत पाटील, गणेश साठे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवा पाटील होळकर, बाबा टकले, राधाकृष्ण वाळुंज, संजय जपकर, सरपंच, उपसरपंच सह गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.