Pimpri : ….आणि चिल्लर मोजून अधिकारीही दमले! चिंचवडमध्ये डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pimpri : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सध्या निवडणूक होत आहे. काल यासाठी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा यावेळी झाली.

अर्ज दाखल करायला आलेल्या एका अपक्ष उमेदवाराने डिपॉझिट जमा करण्यासाठी थेट दहा हजारांची चिल्लर घेऊन आलेला बघायला मिळाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना चिल्लर मोजायला बराच वेळ लागला. यामुळे याची जोरदार चर्चा झाली.

अपक्ष उमेदवार राजू बबन काळे यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. त्यांनी डिपॉझिटसाठी आणलेली रक्कम चिल्लरच्या स्वरुपात आणल्याने अधिकाऱ्यांना ती मोजण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. काही काळ सर्वच अधिकारी चिल्लर मोजत बसले होते.

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या मराठी चित्रपटातही आपण असा किस्सा पाहिला आहे. यामुळे याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे.

सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या. अनेक घडामोडीनंतर उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे.

यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते निवडणूक लढवण्यवर ठाम आहेत. भाजप नेते सर्वांशी संपर्क करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.