राजकारण

‘अशोक’ सहकारी कारखानासाठी आज होणार मतदान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  अशोक कारखाना संचालक मंडळासाठी आज रविवारी रोजी मतदान हाेत आहे. दरम्यान मतमाेजणाी साेमवारी थत्ते मैदानाजवळील गुजराती मंगल कार्यालय येथे हाेणार आहे.

हि निवडणूक गाजणार आहे कारण कि, शेतकरी संघटना परिवर्तन करणार का पुन्हा एकदा मुरकुटे यांच्याकडे एकहाती सत्ता राहणार याचा निर्णय आज मतपेटीत बंद होणार आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 11 हजार 774 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीची तयारी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व संगमनेरचे सहाय्यक उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

पढेगाव, कारेगाव, टाकळीभान, वडाळा महादेव, व उंदिरगाव या पाच गटात 32 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. प्रत्येक मतदाराला 20 मते देण्याचा अधिकार आहे.

तर सोसायटी मतदारसंघात 48 मतदान असून त्यांना 21 वा संचालक निवडून द्यायचा आहे. मतदानाची संपूर्ण तयारी झाली असून त्यासाठी 300 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतमोजणी सोमवार, 17 जानेवारी 2022 रोजी शहरातील वॉर्ड नं. 7, थत्ते मैदानाजवळ, गुजराती मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पुरी यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office