राजकारण

Pradeep Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती…

Published by
Ahmednagarlive24 Office

Pradeep Gawli : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अनेकांना आपल्या पक्षात घेत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आता ते पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सध्या उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यामागे खंबीरपणे उभे असले तरी दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे.

सध्या भाजपशी हातमिळवणी करुन एकनाथ शिंदे यांनी नवा संसार थाटला. नंतर शिवसेनेवर दावा करुन सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगातही एकनाथ शिंदे ठाकरेंना भिडले. आठवड्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

यामुळे आता शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहेत. मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं शिवसेना पक्षात जाहीर स्वागत केलं. आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांचा फायदा होणार आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे आणि अरुण गवळी यांचे एकेकाळी मधुर संबंध होते. तुमचा दाऊद तर आमचा गवळी. हे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य एकेकाळी खूप गाजले होते. आता गवळी शिंदे यांच्याकडे गेले आहेत.

Ahmednagarlive24 Office