Ahmednagar Politics : लोकनियुक्त महिला सरपंच सदस्य अपात्र ! तालुक्यात एकच खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अकोले तालुक्यातील राजुरच्या लोकनियुक्त सरपंच महिला पुष्पा दत्तात्रय निगळे व सदस्य ओंकार नवाळी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवल्याने त्यांचे सरपंच व सदस्य पद धोक्यात आले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा निकाल आ. किरण लहामटे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी राजुर ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची जनतेतून निवडणूक होऊन सरपंच पदी पुष्पा निगळे या निवडून आल्या. वर्षभरापूर्वी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राजूरचे सरपंच पद एसटी महिला राखीव आले होते.

यामध्ये आमदार लाहमटे गटाकडून पुष्पा निगळे व माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून माजी सरपंच गणपत देशमुख यांच्या पत्नी शोभा गणपत देशमुख यांच्यात सरपंच पदाची लढत झाली.

यात अवघ्या १९ मताच्या फरकाने देशमुख यांना पराभव पत्करावा लागला व पुष्पा निगळे या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्यात. मात्र माजी सरपंच गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या या निवडीला आव्हान देत अतिक्रमण मुद्दयाच्या आधारावर सरपंच पुष्पा निगळे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल करून त्यांना अपात्र करावी, अशी मागणी केली.

त्यानुसार दोन्ही बाजूने दावे प्रति दावे दाखल होऊन सहा सात महिने यावर युक्तिवाद होऊन (दि.५) सप्टेंबर २०२३ रोजी यावर निर्णय होऊन अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम (१) (ज-३) प्रमाणे सरपंच पुष्पा निगळे यांना अपात्र ठरवले असून तसा आदेश आज संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे राजुर वार्ड क्रमांक दोन मधील उमेदवार ओंकार नवाळी यांचे देखील ग्रामपंचायत सदस्य पद त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनुसार अपात्र करण्यात आले आहे

एक वर्षांपूर्वी प्रथमच राजुर ग्रामपंचायत निवडणूकीत प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक होऊन सरपंच पदी पुष्पा निगळेया निवडून आल्या होत्या. राजुर ग्रामपंचायत मध्ये बहुमत माजी आमदार वैभव पिचड यांचे गटाचे बहुमत असून ११ सदस्य आहेत तर आ. डॉ. किरण लहामटे गटाचे सरपंच व ६ सदस्य आहेत. या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडे १५ दिवसांच्या आत अपील करण्यासाठी मुदत दिली आहे.