राजकारण

Pune : मोठी बातमी! कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी तयारी केली असून उमेदवार देखील फायनल केले आहेत. यामध्ये आता भाजपने आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्वीनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी कसब्यातून काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यामध्ये आम आदमी पार्टी देखील निवडणूक लढवणार आहे. मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर आज अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल.

दरम्यान, या रिक्त जागांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता होती. मात्र नंतर कोणीही माघार घेत नसल्याचे चित्र दिसून आले. यामुळे रंगत वाढली आहे.

Ahmednagarlive24 Office