देशभरात कोरोनाचा कहर वाढत असताना लॉकडाऊन हाच पर्यंत त्याला आहे. त्याशिवाय हा रोग आटोक्यात येणार नाही. यामुळे छोट्यांपासून मोठे कारखाने बंद आहेत. व्यवसाय उद्योग धंदे बंद पडले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सर्व काम बंद असल्याने भविष्यात अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता विविध तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सध्या जगासमोर अर्थव्यवस्थेला पुन्हा सुधारण्याचं मोठं आव्हान आहे.
या संदर्भात त्यातच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी अर्थव्यवस्थेच्या संकटाविषयी विविध प्रश्न उपस्थित केले आणि रघुराम राजन यांनी त्याची उत्तर दिली.
यातील अनेक उत्तरं ही धक्कादायक असणार आहेत. मात्र येत्या काळात अर्थव्यवस्था रुळावर आणणं हे मोठं आव्हान असणार आहे असं राजन म्हणाले.